आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यात्रा महाेत्सव:श्री विठ्ठल-रुक्मिणी रथ मिरवणुकीने यात्रा महाेत्सवाला प्रारंभ

कळवण2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराचे ग्रामदैवत श्री विठोबा महाराज यात्रा महोत्सवाला श्री विठ्ठल-रखुमाईच्या महापूजेने व श्री विठोबा महाराज रथ मिरवणुकीने बुधवारी प्रारंभ झाला. जया एकादशीच्या शुभमुहूर्तावर गांधी चौकातील विठ्ठल मंदिरात सकाळी सहा वाजता मर्चंट को- ऑप. बँकेचे संचालक सागर शिरोरे यांनी सपत्नीक सहकुटुंब महापूजा केली.

आकर्षक विद्युत रोषणाई पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे. यात्रा महोत्सवानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी रथाची पूजा शिवस्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार व यात्रा कमिटीचे अध्यक्ष मोतीराम पगार यांनी सपत्नीक केल्यानंतर मिरवणुकीला दुपारी १ वाजता विठ्ठल मंदिरापासून ढोल-ताशांच्या गजरात प्रारंभ झाला.

बातम्या आणखी आहेत...