आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Yogi Adityanath Ranks First Among The Best Chief Ministers In The Country, See How Chief Minister Uddhav Thackeray Ranks

सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री:देशातील सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्र्यांमध्ये योगी आदित्यनाथ पहिल्या क्रमांकावर, पाहा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कितव्या क्रमांकावर

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुकतेच 'इंडिया टुडे ग्रुप' आणि 'कार्वी इनसाइट्स'ने केलेल्या 'मूड ऑफ द नेशन 2020' एमओटीएनच्या सर्वेक्षणानुसार योगी आदित्यनाथ हे देशातील सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री ठरले आहेत. सलग तिसऱ्यांदा 'सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री' ठरण्याचा मान त्यांना मिळाला आहे. राज्यात नुकत्याच झालेल्या अपहरण आणि खुनाच्या घटना घडूनही आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेश सरकारला जनता पाठिंबा दर्शवत असल्याचे चित्र आहे.

योगी आदित्यनाथ यांना एकूण 24 टक्के मते मिळाली आहेत. मागच्या सर्वेक्षणाच्या तुलनेत यंदा त्यांना जास्त मत मिळाली आहेत. त्यांच्या मतांमध्ये यावेळी सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. उत्तर प्रदेशातील गुन्हेगारीवरुन राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर अनेक वेळा प्रश्न उपस्थित केले जात आहे. असे असूनही योगी आदित्यनाथ यांच्या कारभारावर लोकांनी समाधान व्यक्त केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कितव्या क्रमांकावर?
विशेष म्हणजे या सर्वेक्षणात आघाडीवर असणाऱ्या सात मुख्यमंत्र्यांपैकी सहा मुख्यमंत्री हे काँग्रेस किंवा भाजपचे नाहीत. दुसऱ्या क्रमांकावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आहेत. त्यांना 15 टक्के मतं मिळाली आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी हे 11 टक्के मतांसह तिसऱ्या क्रमांकांवर आहेत. ममता बॅनर्जी यांनी चौथा क्रमांक पटकावला आहेत. त्यांना 9 टक्के मतं मिळाली आहेत. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 7 टक्के मतांसह सातव्या क्रमांकावर आहेत.