आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • You Now Have The Opportunity To Work In The Process Of Rural Development Ajit Pawar Congratulated Newly Elected Members Of Gram Panchayat

पवारांचा नवनिर्वाचित सदस्यांना संदेश:'ग्रामविकासाच्या प्रक्रियेत काम करण्याची संधी आता तुम्हाला मिळाली आहे; गाव कारभाऱ्यांनो, आता मिळालेल्या संधीचे सोने करा'

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'जय-पराजय विसरुन गावाच्या विकासासाठी एकत्र या'

आज राज्यातील ग्राम पंचायतींचे निकाल हाती येत आहेत. ग्राम पंचायत निवडणुक स्थानिक पातळीवरची असल्यामुळे येथील समीकरमे वेगळी असतात. दरम्यान, आज निवडुन आलेल्या आणि पराभूत झालेल्या उमेदवारांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक आवाहन केले आहे.

राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल आज (दि. 180) जाहीर झाले. या निवडणुकीतील सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रसार माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, 'स्थानिक स्वराज्य संस्था लोकशाहीचा पाया भक्कम करणारी यंत्रणा आहे. या यंत्रणेतील ग्रामपंचायत हा महत्वाचा घटक आहे. या ग्रामविकासाच्या प्रक्रियेत काम करण्याची संधी आता तुम्हाला मिळाली आहे. गावाचा विकास करण्यासाठी लोकांनी तुमच्यावर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे तुमची जबाबदारी आता आणखी वाढली आहे. गाव कारभाऱ्यांनो, आता मिळालेल्या संधीचे सोने करा, जय-पराजय विसरुन गावाच्या विकासासाठी एकत्र या,' असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना केले आहे.

बातम्या आणखी आहेत...