आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार:11 शिक्षकांना मिळणार जिल्हा परिषदेचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार

परभणी24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षक दिनाचे औचित्य साधून यंदा परभणी जिल्ह्यातील ११ जिल्हा परिषद शिक्षकांना जिल्हा परिषदेचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी दिली आहे.

जि.प.तील ९ प्राथमिक शिक्षक आणि २ माध्यमिक शिक्षक अशा एकूण ११ उत्कृष्ट शिक्षकांची निवड करण्यात आली. त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल. यात दत्तात्रय परबत (प्रा. शा. भेंडेवाडी, ता. गंगाखेड), शेख इक्बाल इस्माईल (प्रा.शा. चारठाणा-उर्दू, ता. जिंतूर), मायादेवी गायकवाड (प्रा.शा. उक्कलगाव, ता. मानवत), सुभाष चव्हाण (प्रा.शा.वाडी खु.ता.पालम), सुधाकर गायकवाड (प्रा.शा. पिंपरी देशमुख ता. परभणी), सोमनाथ डोंगरे (प्रा.शा. माळीवाडा, ता. पाथरी), आबनराव पारवे (प्रा.शा. फुकटगाव, ता. पूर्णा), पद्माकर गौंडगे (प्रा.शा.देऊळगाव गात, ता. सेलू), रंजना डोंगरे (कंे.प्रा.शा. सोनपेठ), प्रतिमा वाव्हुळे (जि.प. जांब, ता. परभणी), राम परसराम आतराम अशा ११ शिक्षकांना समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...