आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध वाळू उपसा:गोदापात्रात अवैध वाळू उपसाप्रकरणी 94 लाखांचा मुद्देमाल केला जप्त

परभणी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील मोहळा येथे १० मे रोजी पहाटेच्या सुमारास गोदावरी नदीच्या पात्रातील रेती बोटीने काढून पोकलेनच्या साहाय्याने हायवामध्ये भरत विक्रीसाठी नेताना पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत दोन बोटी, ४ पोकलेन, १२ हायवा ट्रक व दोन हायवा ट्रक भरून रेती असे ९४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी ३५ आरोपींविरोधात सोनपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. कुठलाही परवाना नसताना शासनाचा महसूल बुडवून बेकायदेशीररीत्या रेतीचा साठा करत नदीच्या नैसर्गिक प्रवाहास बाधा होईल अशा प्रकारचे उत्खनन करण्यात आले. आरोपींविरुद्ध सोनपेठ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...