आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेलू अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण:2 आरोपीना चारठाणा परिसरातून केली अटक; 'ती' सुरक्षित कधी होणार, नागरिकांचा सवाल

परभणीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सेलू शहरातील 10 वर्षीय अल्पवयीन मुलगी आणि तिच्या मावसभावास दुचाकीवरून पळवून नेत मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना सेलू तालुक्यात घडली. याप्रकरणी सेलू ठाण्यात सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असलेल्या सेलू येथील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणातील आरोपीना पकडण्यात पोलिस प्रशासनाला यश आले आहे.

सेलू तालुक्यातील दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोंघा अज्ञात व्यक्तींनी अत्याचार केल्याची घटना घडली होती. यासंदर्भात सेलू पोलिस ठाण्यात पीडितेच्या आईने सोमवारी सायंकाळी तक्रार दाखल केल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात संताप व्यक्त करण्यात येत होता. जिल्हा पोलिस अधीक्षक व वरिष्ठ पोलिस अधिकारी हे सेलू मध्ये तळ ठोकून होते. आरोपीच्या शोधासाठी संपूर्ण यंत्रणा अहोरात्र मेहनत घेत होती. अखेर जिंतूर तालुक्यातील चारठाणा परिसरातून आरोपीना ताब्यात घेण्यात आले.

नेमके काय घडले होते?

सेलू येथे एक अल्पवयीन मुलगी आपल्या भावासोबत रस्त्याने जात असताना दोघा युवकांनी त्यांना बळजबरीने मोटारसायकलवर बसवले व शहराबाहेर गेल्यानंतर तिच्या भावाला सोडून अल्पवयीन मुलीला शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्या मुलीने घरी येऊन घडलेला प्रकार पालकांना सांगितल्यावर त्यांनी सोमवारी रात्री सेलू पोलिसांत तक्रार दाखल केली.

बातम्या आणखी आहेत...