आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:जिंतूर तालुक्यात चिमुकलीचा खून करून मातेने केली आत्महत्या

परभणी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी जिल्ह्यातील पिंपळगावात (ता.जिंतूर) तीन महिन्यांच्या चिमुकलीचा गळा दाबून आईने आधी तिचा खून केला व नंतर घरातील खांबाला तिचा मृतदेह लटकवला. त्यानंतर गळफास घेऊन आईने आत्महत्या केली. १८ जानेवारी रोजी ही घटना घडली होती. पण १ फेब्रुवारीला यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला. पायल राठोड व त्यांची तीन महिन्यांची मुलगी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या होत्या. माहिती मिळताच बामणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता अत्यंत भयावह चित्र होते. पोलिस निरीक्षक जी.ई.घुमे यांनी घटनेचा तपास केला. तेव्हा आईनेच चिमुकलीचा खून करून आत्महत्या केल्याचे समोर आले.

बातम्या आणखी आहेत...