आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचार:दहावर्षीय मुलीला दुचाकीवर उचलून नेत दोघांचे अत्याचार, सेलू तालुक्यातील घटना, पीडित भावासोबत शेतात जात होती

सेलू22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहावर्षीय मुलगा व मुलीला दुचाकीवरून उचलून नेत शिवारात मुलीवर दाेघा जणांनी अत्याचार केले. ही घटना सोमवारी (५ सप्टेंबर) सेलू तालुक्यात घडली. दाेन अनाेळखी तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीला घेऊन जाताना दाेघे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.

पीडित मुलगी व तिचा मावस भाऊ शेताकडे जात हाेते. त्या वेळी दुचाकीवर आलेल्या दाेघांनी त्यांना बळजबरीने दुचाकीवर बसवले. मुलीवर अत्याचार केला. यानंतर नराधमांनी वालूरमार्गे कौसडी फाटा येथे रस्त्यावर त्यांना सोडून दिले. याप्रकरणी एका महिलेच्या फिर्यादीवरून मंगळवारी सेलू पोलिस ठाण्यात दोन अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधीक्षक जयंत मीना, अपर पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, उपविभागीय पोलिस अधिकारी अबिनाशकुमार, एलसीबीचे पोलिस निरीक्षक चव्हाण, रावसाहेब गाढेवाड यांनी तपासाची चक्रे फिरवली. मात्र, आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही.

या प्रकरणाचा पुढील तपास भाग्यश्री पुरी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. दोन दिवस उलटूनही पोलिसांना आरोपी सापडले नाहीत. लवकरच आराेपींना पकडण्यात येईल, असे सेलू येथील पोलिस उपनिरीक्षक भाग्यश्री पुरी यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...