आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:अक्षर आनंदचे प्रमुख विनोद शेंडगे प्रवास मार्गावरील 30 गावांमध्ये वाचनाचे महत्त्व सांगणार

गणेश लोखंडे | परभणीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मन, मेंदू समृद्ध ठेवण्यासाठी वाचन अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच निरोगी आयुष्यासाठी सायकलिंगचा व्यायाम उत्तम मानला जातो. या दोन्हीची सांगड घालत परभणीतील शिक्षक तथा अक्षर आनंद या संस्थेचे विनाेद शेंडगे यांनी परभणी-जालना, औरंगाबाद-नगर असा सायकल प्रवास सुरू केला आहे. १ मे रोजी परभणीतून या उपक्रमाची सुरुवात झाली असून ६ रोजी पुण्याला ते पोहोचणार आहेत. यादरम्यान ३० गावांमध्ये थांबून ते वाचन संस्कृतीबद्दल जनजागृती करणार आहेत.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त अक्षर आनंदच्या वतीने १५ जून ते २४ सप्टेंबरदरम्यान अग्रलेख वाचन स्पर्धा घेतली जात आहे. या उपक्रमाबद्दलही ते नागरिकांना सांगतील. याबद्दल सांगताना शेंडगे म्हणाले की, वर्तमानपत्र हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. यातील अग्रलेख हा वर्तमानपत्राचा आत्मा आहे. सोशल मीडियाच्या युगात अग्रलेख हा जनमानसावर प्रभाव पाडू शकतो, ही भावना कमी होत आहे. ही बाब लक्षात घेता अग्रलेख वाचन स्पर्धा घेतली जात आहे. या उपक्रमासाठी १ लाख ३७ हजार पुस्तके दानरूपात प्राप्त झाली आहेत. याआधी शेंडगे यांनी संतांनी दिलेली शिकवण आणि त्यांचे विचार यांची प्रेरणा घेऊन गंगाखेड ते नर्सी नामदेव सायकलवारी पूर्ण केली. संत जनाबाई आणि संत नामदेव यांची शिकवण, त्यांचे विचार यांचा प्रचार व प्रसार केला आहे. दरम्यान, सायकल प्रवासाला सुरुवात करताना परभणी येथे त्यांचा सत्कार करून निरोप देण्यात आला. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी हिरवी झेंडी दाखवून सायकलिंग मोहिमेला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी बालाजी कातकडे, प्राचार्य दिगंबर मोरे, अक्षर मानवचे परभणी शहराध्यक्ष शामराव रणमाळ आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

असा असेल प्रवासाचा मार्ग
अग्रलेख स्पर्धेबद्दल लोकांना सांगण्यासाठी त्यांनी १ जून रोजी परभणीतून सायकलिंगला सुरुवात केली. मानवतमार्गे सेलू, २ रोजी सेलू येथून परतूर, वाटूर फाटा, रामनगर व जालना येथे मुक्कामी थांबणार आहेत. ३ जूनला बदनापूर, चिकलठाणा, औरंगाबाद येथे पोहोचणार असून वाळूज येथे मुक्काम करतील. ४ रोजी ढोरेगाव, नेवासा, घोडेगाव व नगर मुक्कामी असतील.५ रोजी शिरूर, रांजणगाव, शिक्रापूर तर भीमा कोरेगाव येथे मुक्काम करणार आहेत. ६ रोजी वाघोली, आगा खान पॅलेस, त्यानंतर पुणे येथे ते पोहोचणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...