आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Parbhani
  • Bhaskar Jadhav's Attack On The Shinde Group Will Result In The Defeat Of Shahaji Patil In The Upcoming Elections; Even After Giving Everything, Bhumre Was Dishonest

भास्कर जाधवांचा शिंदे गटावर हल्लाबोल:आगामी निवडणुकीत शहाजी पाटलांचा पराभव; सगळं काही दिलं, तरी भुमरेंकडून बेईमानी

परभणी22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेन नेते आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आमदार शहाजी पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. तर सगळे काही दिले, तरी भुमरेंनी बेईमानी केली, असा आरोप आमदार भास्कर जाधव यांनी मंत्री संदीपान भुमरेंवर केली आहे.

आमदार भास्कर जाधव सध्या परभणी दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी खासदार संजय जाधव यांच्या निवासस्थानी जात त्यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत संदीपान भुमरे आणि शहाजी बापू पाटील यांच्यावर टीका केली आहे

भास्कर जाधव म्हणाले?

शिवसेनेचे नेते भास्कर जाधव, शिवसेनेने संदीपान भुमरेंना पैठणमधून 6 वेळा उमेदवारी दिली आहे. त्यांना कॅबिनेट मंत्री केले आणि उद्धव ठाकरेंनी सर्व काही देऊनही संदीपान भुमरेंनी बेईमानी केली, असा आरोप केला आहे. शिवसेनेला धोका देऊन, विश्वासघात करून शिवसेनेला सोडून गेले. कारण जे मिळवले आहे, ते सर्वांना वाटले पाहिजे आणि ते वाटत आहे, असा दावा भास्कर जाधव यांनी केला आहे. अफवा असल्याचे काही कारण नाही असेही भास्कर जाधवांनी म्हटले आहे.

शहाजी पाटलांवर टीका

आमदार शहाजी पाटील हे कोणी मोठे नेते नाही, त्यांनी केलेले वक्तव्य हे निष्ठेचे नाही, असे सांगतानाच शहाजी पाटील पुढच्या दोन वर्षात घरी बसणार, असे भास्कर जाधवांनी म्हटले आहे. तर निधी वाटपात दुजाभाव होत असल्याने विधानसभेत बोलणार असल्याचा आरोपही जाधव यांनी केला. तर सदा सरवणकर यांच्यावर बोलण्याचे जाधवांनी टाळले.

शिंदेंवर टीकास्त्र

राज्याच्या प्रमुखाने राज्यातल्या जनतेकडे समन्यायाने बघायचे असते. परंतु जनतेला सुद्धा आता पश्चाताप झाला आहे. ज्यांना झाला नव्हता, त्यांनाही आता पश्चाताप होईल, कोणती चुकीची लोक सत्तेवर आली आहे. जी माणसे राजकारण बघून पाठबळ, पाठिंबा बघून लोकांना मदत करतात, असे जर मदत करत असतील, तर बंडूशेठ जाधव, शिवसेना स्थानिक लोकांना न्याय मिळवून देतील असे आमदार भास्कर जाधव म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...