आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन आरोपींना अटक:सेलूतील चिमुकलीवर अत्याचार करणारे दोन्ही आरोपी जेरबंद

सेलू/परभणी19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेलू शहरातील एका भागातून दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी दहा वर्षीय मुलगा व मुलीचे अपहरण केले होते. यानंतर मुलीवर अत्याचार केल्याची घटना मंगळवारी घडली होती. अपहरणानंतर चिमुकलीस दुचाकीवरून घेऊन जातानाचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले होते. या प्रकरणातील दोन आरोपींना जिंतूर तालुक्यातील राजेगाव शिवारातून अटक केली. अंगद घुले (२३), तुकाराम घुले (२४, मानमोडी, ता. सेलू) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.

सेलू येथील १० वर्षीय चिमुकली आणि तिच्या भावाचे दोन नराधमांनी दुचाकीवरून अपहरण केले. वालूरमार्गे कौसडी येथे आल्यानंतर त्यांनी चिमुकलीच्या भावास फाट्यावर सोडून दिले. त्यानंतर नराधमांनी िचमुकलीवर अत्याचार केला. पीडितेच्या नातेवाइकांच्या फिर्यादीवरून सेलू पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीणा, सहायक अधीक्षक मुमाका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली राजेगाव शिवारातून दोघांना पकडले.

बातम्या आणखी आहेत...