आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:‘भारत जोडो यात्रा तळागाळापर्यंत पोहोचवा’: नाना पटोले यांनी केले आवाहन

परभणीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी नांदेड, हिंगोली, शेगाव येथे होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

शहरातील बी. रघुनाथ सभागृहात ३ नोव्हेंबर रोजी यात्रेसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे बोलत होते. ते म्हणाले की, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला देशभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. राहुल गांधी हे नांदेड, हिंगोली आणि शेगाव येथे यात्रेनिमित्त येत आहेत. परभणी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी या भारत जोडो यात्रेविषयी सर्वसामान्य नागरिकांत जनजागृती करून यात्रेमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन करत केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारवर टीका केली.

भारत जोडो यात्रा ही आपल्यासाठी एक संधी आहे. या संधीचे सोने करावे. मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे या भावनेतून प्रत्येकाने काम करावे. त्यामुळे पक्ष वाढण्यास मदत होईल, असेही त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. या वेळी आ. सुरेश वरपुडकर, माजी खा. तुकाराम रेंगे पाटील, अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिध्दार्थ हत्तीअंबिरे, अ‍ॅड. मुजाहिद खान, समशेर वरपुडकर, देवानंद पवार, बाळासाहेब रेंगे, रविराज देशमुख, माजू लाला, नदीम इनामदार, बाळासाहेब देशमुख आदींसह काँग्रेसचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...