आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इलेक्ट्रिक स्कूटरने पेट घेतला:परभणीत चार्जिंगला लावलेली इलेक्ट्रिक स्कूटर जळून खाक

परभणीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी शहरातील कारेगाव रोडवरील विजयश्रीनगरातील दिनेश बालाजी काळे यांच्या घराच्या संरक्षक भिंतीच्या आत चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरने अचानक पेट घेतल्याची घटना मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. दिनेश काळे यांनी ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केली होती. दरम्यान, मंगळवारी सकाळी ही इलेक्ट्रिक स्कूटर घराच्या संरक्षक भिंतीलगत उभी करून चार्जिंगला लावलेली होती. इलेक्ट्रिक स्कूटरमधून धूर निघताना दिसला. यानंतर इलेक्ट्रिक स्कूटरने पेट घेतला. आगीतून आवाजही येत होते. शेजाऱ्यांच्या मदतीने पाणी टाकून आग विझविण्यात आली. मात्र तोपर्यंत इलेक्ट्रिक स्कूटर जळून खाक झाली होती.

बातम्या आणखी आहेत...