आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कडब्याच्या गंजी आग:गुंजमध्ये दीड लाख कडबा पेंडी जळून खाक

परभणी16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाथरी तालुक्यातील गुंज येथील विष्णू मंदिर गोशाळेमधील कडब्याच्या गंजीला लागलेल्या आगीमध्ये सुमारे दीड लाख कडबा पेंडीसह अन्य उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना रविवारी (१ मे) दुपारच्या सुमारास घडली. या घटनेमध्ये विष्णू मंदिर गोशाळा येथे कडब्याची वळई करून ठेवलेल्या गंजीस अचानक आग लागली. यामुळे त्या कडब्याच्या गंजीने पेट घेतला. ग्रामस्थांनी धाव घेत आग आटोक्यात आणण्यचा प्रयत्न केला. दरम्यान, आगीची माहिती मिळाल्यानंतर पाथरी नगर परिषदेचे अग्निशमन दलही घटनास्थळी दाखल झाले. परंतु, आगीने रौद्ररूप धारण केले असल्याने पाहता पाहता या आगीत कडब्याची गंजी जळून खाक झाली. आगीचे कारण समजू शकले नाही.

बातम्या आणखी आहेत...