आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड-औरंगाबाद जिल्ह्यात पावसाची शक्यता:पाच दिवस किमान तापमानात फारशी तफावत राहणार नसल्याचा तज्ज्ञांचा अंदाज

परभणी8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार, मराठवाडा विभागामध्ये पुढील पाच दिवस किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. २५ जानेवारी रोजी बीड व औरंगाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिशय हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात २७ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहून तुरळक ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. विस्तारित अंदाजानुसार मराठवाड्यात २९ जानेवारी ते ४ फेब्रुवारीदरम्यान कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी तर किमान तापमान सरासरीएवढे तर पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

मका : लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोढेट ५% ४ ग्रॅम किंवा स्पिनेटोरम ११.७ एससी ४ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून वरील कीटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करा.

रब्बी ज्वारी : फुलोरा येण्याच्या अवस्थेत (पेरणीनंतर ७० ते ७५ दिवस) व कणसात दाणे भरण्याच्या अवस्थेत (पेरणीनंतर ९० ते ९५ दिवस) पाणी द्यावे. गहू : कांडी धरण्याच्या अवस्थेत व पीक फुलावर असताना (पेरणीनंतर ६५ ते ७० दिवस) पाणी द्यावे.

बातम्या आणखी आहेत...