आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमाल तापमान:मराठवाड्यात 3, 4 मे रोजी पावसाची शक्यता

परभणी19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यात दोन दिवसांत कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. त्यानंतर पुढील ३ ते ५ दिवस कमाल तापमानात हळूहळू २ ते ३ अंश सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता असल्याचे परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मोसम सेवा विभागाचे मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ. के. के. डाखोरे यांनी सांगितले.

मंगळवार, ३ मे रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात आणि बुधवार, ४ मे हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी ३० ते ४० किमी) राहून तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...