आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालविवाह:परभणी तालुक्यातील लोहगाव, वडगावात रोखला बालविवाह

परभणी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे २ नोव्हेंबर रोजी परभणी तालुक्यातील लोहगाव व ९ नोव्हेंबर रोजी वडगाव सुक्रे येथे बालविवाह रोखण्यात आला. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयास २ नोव्हेंबर रोजी परभणी तालुक्यातील लोहगाव व वडगाव सुक्रे येथे एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार मुलीचे नाव, लग्नाचे ठिकाण आणि मुलीच्या वयाचा पुरावा हस्तगत करण्यात आला. तसेच ग्रामसेवक जी. बी. काळे, अंगणवाडी सेविका कोंडाबाई कऱ्हाळे, सरपंच-उपसरपंच यांच्या उपस्थितीत हा बालविवाह थांबवण्यात आला. िजल्हा महिला व बालविकास अधिकारी कैलास तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी चाइल्ड लाइनचे समन्वयक संदीप बेंडसुरे, टीम मेंबर योगेश्वरी पोतदार, सुशील गोरे, जिल्हा बालसंरक्षण कक्षाच्या आम्रपाली पाचपुंजे, पोलिस उपनिरीक्षक हनुमान नागरगोले, बीट जमादार मुळे यांनी कार्यवाही केली.

बातम्या आणखी आहेत...