आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:बनावट नोटा केल्या तयार;‎ मानवतचा तरुण अटकेत‎

परभणी‎12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकांची फसवणूक करण्याच्या‎ उद्देशाने बनावट नोटा तयार‎ केल्याप्रकरणी मानवत येथील एका‎ युवकास स्थानिक गुन्हे शाखेच्या‎ पथकाने मंगळवारी (१४ मार्च)‎ रोजी ताब्यात घेतले आहे.‎ यासंदर्भात सविस्तर माहिती अशी‎ की, मानवत येथील विशाल खरात‎ हा कलर प्रिंटरच्या सहाय्याने‎ भारतीय चलनाच्या बनावट नोटा‎ तयार करत असल्याची माहिती‎ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला‎ मिळाली. त्यावरून पथकाने‎ मंगळवारी मानवत येथील विशाल‎ खरात याच्या घरी छापा मारला‎ असता दोनशे रुपयाच्या ३० नोटा व‎ कलर प्रिंटर, रिफील इंक, कटर व‎ अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला.‎ पोलिसांनी आरोपी विशाल खरात‎ यास ताब्यात घेतले आहे. बनावट‎ नोटांमागे रॅकेट आहे का? याचा‎ तपास पोलिस करणार आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...