आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यूनंतरही परवड VIDEO:नरसापूरच्या करपा नदीवर पूल नसल्याने अंत्यसंस्कारासाठीही हाल, बैलगाडीतून भयंकर प्रवास

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मृत्यूनंतरही परवड सुरू असेल तर...अंत्यसंस्कारासाठी अतोनात हाल होत असतील तर...असंच होतंय...परभणी जिल्ह्यातल्या नरसापूरमध्ये. करपा नदीवर पूल नाही. दुसरीकडे चिखलमय रस्ता. त्यामुळे नातेवाईकांना ताटीवरचा मृतदेह काढून चक्क बैलगाडीतून न्यावा लागतोय. ही भयाण शोकांतिका कधी संपणार, असा सवाल होतोय.

सेलू तालुक्यातील नरसापुर गावाजवळून करपरा नदी वाहते. मात्र या नदीवर पूल नसवल्याने गावकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नुकतेच गावातील 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. यावेळी गावाच्या वेशीपर्यंत रुग्णवाहिका आली. मात्र, पुढे नदीवर पूल नसल्याने मृतदेह न्यायचा कसा हा प्रश्न उपस्थित झाला. त्याचप्रमाणे रस्त्यावरही मोठ्या प्रमाणावर चिखल झाला होता. या पार्श्वभूमीवर बैलगाडीतून मृतदेह नेण्यात आला.

मागील वर्षी देखील बैलगाडीमध्ये टाकून न्यावा लागला होता. गावा शेजारून वाहणाऱ्या करपा नदीवर पूल नसल्याने दरवर्षी पावसाळ्यात ही समस्या उद्भवते. मात्र, प्रशासनाला आणि पुढाऱ्यांना याबाबत कुठलेच सोयरसुतक नाही. यासोबतच रुग्ण आणि विद्यार्थ्यांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बातम्या आणखी आहेत...