आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आराेप:परभणीत प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू; हलगर्जीपणाचा आराेप, पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद

परभणीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
सविता अनिल उबरे - Divya Marathi
सविता अनिल उबरे

जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रसूती झालेल्या महिलेचा मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाइकांनी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हलगर्जीपणाचा आरोप केला. याप्रकरणी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, सविता अनिल उबरे (२४, रा. शंकरनगर) या महिलेस प्रसूतीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ३१ ऑक्टोबर रोजी महिलेने एका मुलास जन्म दिला. १ नोव्हेंबर रोजी सविता यांची प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्यांना अपघात विभागात पाठवण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी रक्त कमी असल्याचे सांगितले. त्यानंतर रक्त चढवण्यात आले. परंतु प्रकृती खालावल्याने रुग्णास विष्णुपुरी नांदेड येथे घेऊन जा, असे सांगून रेफर केल्याची कागदपत्रे नातेवाइकांना देण्यात आली. नातेवाइकांनी रुग्णास तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी रुग्ण मृत झाल्याचे सांगितले. नातेवाइकांनी रुग्णास पुन्हा शासकीय दवाखान्यात नेले. उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी तपासणी करून सविताचा मृत्यू झाल्याचे सांगितले. ३१ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरच्या पहाटे साडेपाचपर्यंत कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...