आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामानवत तालुक्यातील मानोली येथील हरिभाऊ अच्युतराव शिंदे (३२) यांनी २० डिसेंबर रोजी झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली आहे. याप्रकरणी सेलू पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मानोली येथील युवक रवी सखाराम काकडेने (२१) बुधवार १४ डिसेंबरला आत्महत्या केली, तर त्यापाठोपाठ १५ रोजी शेतकरी ज्ञानोबा ग्यानदेवराव भांड (५२) यांनी झाडाला गळफास घेतला. मानोली गावात एकीकडे सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम होती. दुसरीकडे चार जणांनी जीवनयात्रा संपवल्याच्या हृदयद्रावक घटना घडल्या. उपविभागीय अधिकारी सेलू व तहसीलदार मानवत यांनी मानोली येथे भेट दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.