आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाजी ब्रिगेड जिंतूरात सामाजिक संघटनेचा उपक्रम:महामंडळाला सुधारीत नावांचे नामफलक भेट

जिंतूर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील बसस्थानकात नव्याने नामांतर झालेल्या शहरांचे नामफलक नसल्यामुळे अडचण निर्माण झाली होती. याची दखल घेऊन संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेने पुढाकार घेऊन नवीन नामफलक दिले आहेत. या वेळी आगारप्रमुख व संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ४ मार्च रोजी बसला नवीन नामफलक लावण्यात आले.

काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव नामांतर केले. परंतु शहरातील बसस्थानकातून सुटणाऱ्या गाड्यांवर जुनेच नामफलक लावण्यात येत होते. ही बाब संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेच्या लक्षात आली. संभाजी ब्रिगेडने पुढाकार घेऊन बाहेरगावी जाणाऱ्या व नामांतर झालेल्या नावाचे नामफलक नव्याने तयार करून एसटीला लावले. या वेळी आगारप्रमुख जवळेकर, संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष बालाजी शिंदे सोसकर, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब काजळे, तालुकाध्यक्ष, जिल्हा संघटक संजय काळे, तालुकाध्यक्ष अॅड. माधव दाभाडे, शेतकरी आघाडी तालुकाध्यक्ष शरद ठोंबरे, तालुका सचिव दामोदर नवले, शहराध्यक्ष सुनील गाडेकर, उदय बांगर, संतोष काकडे, नाना तळेकर, सोपान धापसे, भगवान रोकडे यांच्यासह आगारातील कर्मचारी चालक-वाहक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...