आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्त्यांचा डाव खेळताना मित्रांत वाद:परभणीत मनसे शहरप्रमुखाचा खून; काेण माेठा म्हणत झाला वाद, अन् चाकूने केले वार

परभणी22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहरप्रमुख सचिन पाटील यांचा मंगळवारी (६ सप्टेंबर) पहाटे ३च्या सुमारास मित्र विजय जाधवने चाकूने वार करत खून केला. विरंगुळा म्हणून सर्व मित्र पत्ते खेळत हाेते. या वेळी त्यांच्यात वाद झाला. यातूनच हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आराेपी विजय फरार झाला आहे.

या प्रकरणात सचिन यांचा भाऊ संदीप ऊर्फ रिंकू पाटील यांनी परभणीतील नवा माेंढा पाेलिस ठाण्यात फिर्याद दिली. यात म्हटले आहे की, सोमवारी (५ सप्टेंबर) रात्री मनसे शहरप्रमुख सचिन पाटील, विजय जाधव व अन्य मित्र वसमत रोड येथील शिवरामनगरमधील गिरीश ऊर्फ टिल्या विश्वंभर रेवले यांच्या घरी एकत्र जमले हाेते. पत्त्यांचा डाव रंगला हाेता. त्या वेळी सचिन आणि विजय या दोघांमध्ये खटके उडाले. इतर मित्रांनी त्याकडे दुर्लक्ष केले. “मी मोठा की तू मोठा’ या कारणावरून दोघांत जोरदार खडाजंगी झाली. प्रकरण शिवीगाळ, हमरीतुमरीवरून हाणामारीवर आले. उपस्थित मित्र भांडण

सोडवण्याच्या प्रयत्नात असताना मंगळवारी पहाटे ३ च्या सुमारास विजयने सचिन यांच्या मानेवर आणि पाठीवर वार केले. त्यामुळे माेठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.

घटनास्थळावरील मित्रांनी सचिन पाटील यांना उपचारासाठी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. अतिरक्तस्राव झाल्याने सचिन यांची प्राणज्योत मालवली. घटनेनंतर आरोपी विजय जाधव फरार झाला. याप्रकरणी संदीप पाटील यांच्या फिर्यादीवरून नवा मोंढा पोलिस ठाण्यामध्ये आरोपी विजय जाधव याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक संदिपान शेळके करत आहेत. सचिन यांचा मोठा जनसंपर्क होता.

बातम्या आणखी आहेत...