आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोक्याची घंटा:अकराशे विद्यार्थ्यांच्या नेत्र तपासणीत दहा जणांमागे पाच मुलांना चष्मा!

परभणी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चष्मा लागलेले पाचशेवर विद्यार्थी परभणीतील एकाच शाळेचे

कोरोना काळात आॅनलाइन शिक्षणावर भर देण्यात आला. शिवाय मोबाइलवर स्क्रीन टाइम वाढल्याने शालेय मुलांवर त्याचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. परभणीत एका आरोग्य शिबिरात ११०० विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यातून धक्कादायक वास्तव समोर आले. प्रत्येक दहा विद्यार्थ्यांमागे पाच विद्यार्थ्यांची दृष्टिक्षमता क्षीण झाली आहे. त्यांना तातडीने चष्म्याची आवश्यकता असल्याचे नेत्र तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.

५ डिसेंबर रोजी आरोग्य शिबिर आयोजित केले होते. या वेळी शहरातील परसावतनगर भागात असलेल्या छत्रपती शाहू महाराज विद्यालयातील ११०० विद्यार्थ्यांची सोमवारी (५ डिसेंबर) दंत आणि नेत्र तपासणी करण्यात आली. इयत्ता दुसरी ते पाचवीमधील विद्यार्थ्यांच्या नेत्र तपासणीत एक हजार विद्यार्थ्यांपैकी ५०० विद्यार्थ्यांची दृष्टिक्षमता क्षीण झाल्याचे निदर्शनास आले. अनेक विद्यार्थ्यांचा नंबर +२.५० ते -२.५० पर्यंत असल्याचे आढळून आले. तसेच यापैकी २०० विद्यार्थ्यांना डोळ्यांचे पुढील उपचार घेणे आवश्यक आहे. मोबाइलचा अतिवापर हे प्रमुख कारण असल्याचे तपासणी करणाऱ्या नेत्रतज्ज्ञांनी सांगितले. तसेच व्हिटॅमिनची कमतरतासुद्धा दृष्टिदोषासाठी कारणीभूत ठरत आहे. ऑनलाइन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांनी मोबाइल हातात घेतला तरी त्याचा वापर तेवढ्यापुरता होत नसल्यामुळे दृष्टिदोष उत्पन्न होत आहे. दरम्यान, परभणी शिवसेनेचे उपशहरप्रमुख तथा ऑटो व प्रवासी टॅक्सी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संभानाथ काळे व उपशहरप्रमुख मारुती तिथे यांनी जयभवानी महिला सहकारी सूतगिरणीच्या अध्यक्षा तथा आ. डॉ. राहुल पाटील यांच्या पत्नी डॉ. संप्रिया पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे शिबिर घेण्यात आले.

विद्यार्थ्यांचा मोबाइल स्क्रीन टाइम वाढल्याने उद्भवली गंभीर स्थिती दृष्टिदोषाची प्रमुख कारणे } मोबाइलचा अतिवापर, विशेषत: अंधारात मोबाइल पाहणे } आहारात व्हिटॅमिनची कमतरता } आहारात पालेभाज्यांचा अभाव } दिवसातून अनेकदा चहा घेतल्यानेही समस्या

...तर प्रत्येकाला लागेल चष्मा ^प्राथमिकच्या विद्यार्थ्यांचा रॅटिना नाजूक असतो. मोबाइल स्क्रीनचा अतिवापर केल्यास रॅटिना हा प्रकाश सहन करू शकत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यात दृष्टिदोष निर्माण होत आहे. असाच मोबाइल वापरल्यास प्रत्येक मुलाला चष्मा लागेल. - डॉ. संदीप मोरे

काय आहेत उपाय? >गरज आहे तोपर्यंतच मोबाइलचा वापर करावा >स्क्रीन पाहातना डोळ्यांची उघडझाप करावी >वेळोवेळी डोळे स्वच्छ पाण्याने धूत राहावेत >आहारात पपई, गाजर, पालेभाज्या यांचा आवर्जुन समावेश करायला हवा

चष्मे वाटपही करणार ^हा कार्यक्रम नागरी सुविधा नसलेल्या भागात आयोजित करण्यात आला. या परिसरात मुलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे आरोग्य शिबिर घेण्यात आले. आवश्यक विद्यार्थ्यांना पुढील उपचार, औषधी व शस्त्रक्रिया आणि चष्मेदेखील वाटप केले जाणार आहेत.- संभानाथ काळे, संयोजक.

बातम्या आणखी आहेत...