आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्याचे नाणे अन् जिलेबी देऊन स्त्री जन्माचे स्वागत:परभणी शहरातील जिलेबी विक्रेत्याने राबवला उपक्रम

परभणीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नववर्षाच्या पहिल्या दिवशी दरवर्षी परभणी कन्यारत्नाच्या जन्माचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले जाते. जिलेबीचे व्यावसायिक धरमवीरसिंह दामोदर मागील ११ वर्षांपासून १ जानेवारी रोजी जन्म घेणाऱ्या मुलीस २ ग्रॅम सोन्याचे नाणे व २ किलो हरियाणा जिलेबी देऊन स्वागत करतात. कन्यारत्न झालेल्या इतर ११ कुटुंबीयांना त्यांच्यातर्फे २ किलो जिलेबी देण्यात येते.

परभणीत हरियाणा जिलेबी या छोट्याशा दुकानाचे मालक धरमवीर सिंह व त्यांचा मुलगा सन्नीसिंह हे दोघे या ठिकाणी मागील ४० वर्षांपासून व्यवसाय करतात. दहा वर्षांपूर्वी महाराष्ट्रात स्त्री भ्रूणहत्येचे प्रकरण गाजत होते. मुलींची गर्भातच हत्या करण्याचा प्रकार खूप वाढला होता. त्यामुळे मुलींच्या जन्माचा उत्सव व्हावा, त्यांचे स्वागत व्हावे या भावनेतून त्यांनी हा उपक्रम सुरू केला. १ जानेवारीला कन्यारत्नास जन्म देणाऱ्या कुटुंबाला २ किलो जिलेबी भेट देण्याचा उपक्रम त्यांनी न चुकता राबवला आहे. या वर्षी एका भाग्यवान कुटुंबाला त्यांच्याकडून दोन ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे नाणेदेखील भेट स्वरूपात मिळाले.

लकी ड्रॉ पद्धतीने दिले जाते नाणे लकी ड्रॉ पद्धतीने चिठ्ठी टाकून केवळ जिल्हा शासकीय रुग्णालयात जन्माला येणाऱ्या मुलीच्या भाग्यवान कुटुंबालाच हे सोन्याचे नाणे व दोन किलो जिलेबी देण्यात येते, तर खासगी रुग्णालयात जन्म घेतलेल्या ११ मुलींच्या कुटुंबांना केवळ २ किलो जिलेबी भेट येते. दोन ग्रॅम सोने घेण्यासाठी दररोज होणाऱ्या व्यवसायातून काही रक्कम बाजूला काढली जाते व त्या रकमेतून सोन्याचे नाणे खरेदी केले जाते.

बातम्या आणखी आहेत...