आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लम्पीवर अशी करता येईल मात:शेतकऱ्यांनी दोन महिन्यांसाठी गोठे पूर्ण सील करावे; जनावरांची रोगप्रतिकारशक्ती वाढवावी

परभणी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात गेल्या महिनाभरापासून पसरलेला लम्पी हा आजार नियंत्रणात असून ज्या जनावरांना लम्पी झालेला आहे त्यांच्यावर उपचार चालू असून ते उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. या विषाणूजन्य आजारास प्रतिबंध करण्यासाठी प्रशासन व शेतकरी बांधवानी योग्य काळजी घेतल्याने हा आजार नियंत्रणात असल्याची स्थिती आहे.

राज्यातील लम्पी या विषाणुजन्य आजाराचा प्रसार व घ्यावयाची काळजी यासंदर्भात पशुवैद्यकीय महाविद्यालय परभणीचे प्राध्यापक डॉ.नितीन मार्कंडेय यांच्याशी 'दैनिक दिव्य मराठी'ने संपर्क साधला असता त्यांनी सविस्तरपणे माहिती दिली.

मोकाट जनावरे प्रभावित
लम्पी हा आजार विषाणूजन्य असून तो कीटक व परजीवी मार्फत पसरत असल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे. तसेच असे आजार पसरण्यास मोकाट जनावरे हे मुख्य साधन बनतात. कारण दुधाळ व शेतजमिनीत काम करणाऱ्या पशुधनाची योग्य ती काळजी घेतली जाते. त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक्षमता चांगली असते. परंतु मोकाट जनावरांबाबत अशी स्थिती नसल्याने त्यांना विषाणूजन्य आजार तात्काळ प्रभावित करतात.

रोगप्रतिकारशक्तीत बदल होता कामा नये

ज्या जनावरांची रोगप्रतिकारशक्ती उत्तम आहे त्या प्राण्यामध्ये विषाणूजन्य आजार पसरण्याचा धोका कमी असतो. त्यामुळे शेतकरी बांधवानी जनावरांमध्ये रोगप्रतिकारशक्ती टिकून राहावी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

दोन महिन्यांसाठी गोठे पूर्ण सील करावे
लम्पी हा विषाणूजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर जनावरांचे गोठे पूर्णतः सील करणे आवश्यक आहे. जनावरे व त्यांचे पशुपालक यांच्या व्यतिरिक्त कोणाचाही तेथे प्रवेश असू नये.

दूध निरोगी
जनावरांनमध्ये लम्पी हा चर्मरोग पसरत असला तरी त्यामुळे दुधावर त्याचा कोणताही परिणाम होत नाही. म्हणून दूध हे निसंदीग्धपणे निरोगी आहे.

मोकाट जनावरासंदर्भात कायदा जुनाट
खरेतर जनावरे मोकाट सोडणे हा कायदयाने गुन्हा आहे.स्थानिक स्वराज्य संस्था याबाबतीत कार्यवाही करतात मात्र मोकाट जनावरासंदर्भात सध्या अस्तित्वात असलेला कायदा पुरेसा नाही. त्यामुळे मोकाट जनावरासंदर्भात असलेल्या कायद्यात आवश्यक त्या सुधारणा होणे आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...