आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये सोमवारी उष्णतेची लाट अनुभवण्यास मिळाली. लातूर व हिंगोलीत ३९ अंश सेल्सियस तापमान होते. इतर सहा जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा चाळिशीपार गेला. सकाळी ८ वाजेपासून उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात होत असून दुपारी रस्ते निर्मनुष्य होत आहेत. एप्रिल महिन्यातच अधिक तापमान असताना मे महिन्यात तर उन्हाचा तडाखा वाढणार आहे.
पुढील ४ ते ५ दिवसांत गडगडाटासह जोरदार वारे आणि पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. परंतु मराठवाड्यात मात्र उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. परभणीत सोमवारी पारा ४१.६ अंश सेल्सियसवर गेल्याची नोंद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामान विभागात झाली. सोमवारी नोंदवलेले तापमान हे यंदाच्या उन्हाळ्यातील आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान आहे. एप्रिलच्या सुरुवातीलाच तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सियसच्या पुढे गेल्याने आता मे महिन्यात अधिक तापमानासह उन्हाच्या तडाख्याचा नागरिकांना सामना करावा लागणार आहे. तापमान वाढणार असल्याचे गेल्याच आठवड्यात हवामान विभागाने सांगितले होते.
सूर्य, पृथ्वीतील अंतर कमी झाल्याने तापमान वाढ
सध्या तापमानात सातत्याने वाढ होत आहे. यामागे ग्लोबल वॉर्मिंग, बदलते वातावरण हे प्रमुख कारण आहे. शिवाय सध्या असलेले अँटिसायक्लॉन, वाहत असलेले शुष्क वारे तसेच सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील अंतर कमी असणे यामुळेही तापमानात वाढ होत आहे. - डॉ. के. के. डाखोरे, हवामान तज्ज्ञ, परभणी.
उमरगा तालुक्यात पाऊस
उमरगा तालुक्यातील कुन्हाळी परिसर व लोहारा शहर परिसरात ३ एप्रिलला अर्धा तास झालेल्या वादळी वारा व गारांच्या अवकाळी पावसाने रविवारी सायंकाळी झोडपून काढले. तालुक्यात कुन्हाळी, कदमापूर, हंद्राळ, त्रिकोळी परिसरात वारे जास्त आणि पाऊस कमी असल्याने शिवारासह गावातील पत्रे, अनेक ठिकाणी झाडे मोडली तर शेतातील व घरावरील पत्रे उडाले.
नांदेडमध्ये नागरिक घामाघूम
नांदेडशहरासह जिल्ह्यात उष्णतेची लाट आली असून सोमवारी तापमान ४० अंशांवर नोंदले गेले. नागरिक चांगलेच घामाघूम झाले होते. उन्हाच्या काहिलीपासून सुटका करून घेण्यासाठी नागरिक शीतपेयाचा आधार घेत आहेत. नांदेड शहरात दुपारीच रस्त्यावर शुकशुकाट होत आहे. नांदेडमध्ये मागील आठवड्यापासून तापमान ४० अंशांवर आहे.रुमाल, गॉगलचा आधार
वाढलेल्या तापमानामुळे नेहमी वर्दळ असलेल्या नांदेडच्या रस्त्यावर सोमवारी दुपारी तुरळक वाहतूक पाहायला मिळाली. उन्हाचा तडाखा जाणवत असल्याने नागरिक सध्या टोपी, मोठा रुमाल, गॉगल आदींचा वापरत करत आहेत. आजचे तापमान
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.