आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणी:चार जणांविरोधात आमदार बंब यांची तक्रार

परभणी15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कंत्राटदारासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता या चौघांनी शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी नानलपेठ पोलिस ठाण्यात गुरुवारी आमदार प्रशांत बंब यांनी तक्रार दिली.

आ. प्रशांत बंब यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, १ जानेवारी २०१० ते ३१ डिसेंबर २०१३ दरम्यान परभणी जिल्ह्यातील दैठणा - माळसोना - वझूर - देवळगाव दुधाटे प्रजिमा -४३ रस्त्याची सुधारणा करण्यासाठी (केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत) १ कोटी १९ लाख ११९ रुपयांचे कंत्राट मे. पल्लवी कन्स्ट्रक्शनचे कंत्राटदार एस. जी. पाटील (रा. परभणी) यांना मिळाले. त्यांनी बनावट चलानद्वारे डांबर खरेदी केल्याचे भासवून ते चलन कार्यकारी अभियंता परभणी यांच्याकडे दाखल केले. याद्वारे शासनाची २६ लाख ४४ हजारांची फसवणूक केली. त्याबाबत सन २०१२-२०१३ मध्ये महालेखाकार (लेखापरीक्षा) महाराष्ट्र नागपूर यांच्या लेखापरीक्षा प्रतिवेदन परिच्छेद क्र. २.१.८.५ मध्ये डांबराची खोटी बिले सादर केल्याचे निदर्शनास आणले. यात तत्कालीन शाखा अभियंता, तत्कालीन उपअभियंता उपविभाग परभणी व तत्कालीन कार्यकारी अभियंता हे सहभागी आहेत. कारण देयके अदा करण्यापूर्वी या डांबराचे चलान संबंधित कंपनीकडून पडताळणी करणे क्रमप्राप्त होते.

बातम्या आणखी आहेत...