आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कारवाई:परभणीत गुन्हेगारी वृत्तीच्या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई

परभणी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी पोलिसांनी गुन्हेगारी वृत्तीच्या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले, तर अन्य आरोपी फरार आहेत. परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातील कौसडी येथे ऑगस्ट २०२१ मध्ये बुवाजी रामभाऊ जिवणे यांच्या राहत्या घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करत त्यांच्या पत्नीस चाकूचा धाक दाखवून चोरट्यांनी त्याच्या घरातील नगदी रुपये, सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ३ लाख ८३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. स्थानिक गुन्हे शाखा परभणी येथील प्रभारी अधिकारी सपोनि व्यंकटेश आलेवार यांच्या पथकास आरोपी अमर ऊर्फ अंबू ऊर्फ शिवराव जगदीश शंकर शिंदे (रा. पांगरी, ता. परळी, जी. बीड), अशोक ऊर्फ श्रीनाथ कांच्या ऊर्फ राजू भोसले (रा. शेळगाव, ता. सोनपेठ, जि. परभणी) आ णि अनित ऊर्फ अन्या भोसले, श्याम भोसले, अग्नेश भोसले (तिन्ही रा. नांदुरा, जि. यवतमाळ) यांनी गुन्हा केल्याची गोपनीय माहिती मिळाली हाेती. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी अमर ऊर्फ अंबू ऊर्फ शिवराव जगदीश शंकर शिंदे आणि अशोक ऊर्फ श्रीनाथ कांच्या ऊर्फ राजू भोसले यांचा शोध घेऊन त्यांना अटक करून बोरी पोलिस ठाणे येथे हजर करण्यात आले. इतर आरोपी फरार आहेत.

बातम्या आणखी आहेत...