आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणी:महावितरणचा लाचखोर कनिष्ठ अभियंता जाळ्यात

परभणीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पूर्णा येथे शेतात वीजजोडणी नसल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी दोन हजारांची लाच घेताना ग्रामीण महावितरण कार्यालयातील एका कनिष्ठ अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २ जून रोजी रंगेहाथ पकडले.

तक्रारदाराच्या भावाच्या शेतात सौरऊर्जा पंप मंजूर झाला आहे. हा पंप शेतात बसवण्यासाठी पूर्णा येथील महावितरण कार्यालयातून शेतात विद्युत जोडणी नसल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी आरोपी कनिष्ठ अभियंता संतोष गंगाराम गुंजिटे (२८) याने ३ हजारांची लाच मागितली. तडजोडीअंती २ हजारांची लाच स्वीकारताना संतोषला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नांदेड परिक्षेत्र पोलिस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे, अपर पोलिस अधीक्षक धरमसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली परभणीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक किरण बिडवे, पोलिस निरीक्षक सदानंद वाघमारे, पोलिस निरीक्षक बसवेश्वर जकिकोरे, पोलिस अंमलदार चंद्रशेखर निलपत्रेवार, अनिल कटारे, अतुल कदम, जनार्दन कदम यांच्या पथकाने केली.

बातम्या आणखी आहेत...