आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणीच्या मनसे शहराध्यक्षांचा खून:सचिन पाटील यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला, किरकोळ वादातून घडली घटना

परभणीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परभणी शहर अध्यक्ष सचिन पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. मनसेच्या अधिकृत फेसबुक पेजवरुनही सचिन पाटील यांच्या खुनाची माहिती देण्यात आली आहे.

सोमवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास सचिन पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसह शहरातील कार्यालयात बसलेले असतानाच यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे.

किरकोळ वादातून घटना

आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, किरकोळ वादातून सचिन पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास सचिन पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसह कार्यालयात बसलेले असताना त्यांचा काही जणांशी वाद झाला. हे वाद विकोपाला गेल्याने काही क्षणातच वादाचे रुपांतर हाणामारीत झाले.

मानेवर चाकूने वार

हाणामारीत एका पदाधिकाऱ्याने सचिन पाटील यांच्या मानेवर चाकूने वार केले. त्यामुळे पाटील गंभीर जखमी झाले. सचिन पाटील यांना सहकाऱ्यांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पण, मानेवर गंभीर जखमी झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. हल्लेखोरांबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. त्यांच्या मृत्यूबद्दल मनसेकडून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...