आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणी:परभणीतील तीन वर्षांपूर्वीच्या खून प्रकरणात एकास जन्मठेप

परभणी12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील रमाबाई आंबेडकरनगरात ३ वर्षांपूर्वी झालेल्या युवकाच्या खून प्रकरणात आरोपीस जन्मठेप सुनावण्यात आली. परभणी येथील प्रमुख जिल्हा न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी हा निकाल दिला.

१७ ऑक्टोबर २०१८ रोजी मोहसीन शेख मुजाहिद यांनी सरकारी रुग्णालयात उपचार घेत असताना कोतवाली पोलिसांकडे जबाब नोंदवला होता. त्यानुसार, त्याचा भाचा शेख सोहेल व तो १६ ऑक्टोबर २०१८ रोजी घरासमोर उभे होते. त्या वेळी शेख शाेएब हा वेगात दुचाकी चालवत होता. त्यावरून शेख सोहेलसोबत वाद झाला. त्याने शेख शाेएबला मारहाण केली. त्याने ठाण्यात तक्रार दिली. दुसऱ्या दिवशी आरोपी शेख हाजी, शेख समी शेख तैमूर, शेख शोएब शेख सद्दाम व शेख मोहंमद यांनी फिर्यादी मोहसीन शेख, शेख सोहेल व अन्य गप्पा मारत असताना आरोपी शेख समीने शेख सोहेलच्या छातीत तलवार खुपसली व शेख मोहसीन यांंच्यावर तलवारीने वार केला. शेख सोहेल मृत्युमुखी पडला. या प्रकरणात जिल्हा शासकीय अभियोक्ता डी. यू. दराडे यांनी खटला चालवला. १४ साक्षीदार तपासले. जिल्हा न्यायाधीश ए.एम.पाटील यांनी आरोपीस दोषी गृहीत धरले. आरोपी शेख समीला कलम ३०२ भा.दं.वि.प्रमाणे जन्मठेपेची शिक्षा व १ हजार रुपये दंड, कलम ३२६ भा.दं.वि. प्रमाणे ७ वर्षे सश्रम कारावास व १ हजार रुपये दंड आणि कलम ७/२५ हत्यार कायद्याप्रमाणे ७ वर्षे सश्रम कारावास व १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

बातम्या आणखी आहेत...