आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रकने दुचाकीला चिरडले:मानवतमधल्या भीषण अपघातात शकुंतला विद्यालयाचे दोन शिक्षक जागीच ठार, चालक फरार

परभणी14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी जिल्ह्यातल्या मानवतमध्ये एका ट्रकने दुचाकीला चिरडल्यामुळे दोन शिक्षकांचा जागीच मत्यू झाला. कल्याण ते निर्मल राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात घडला. रामेश्वर कदम आणि गंगाधर राऊळ अशी मृत शिक्षकांची नावे आहेत. ते मानवतमधील शकुंतला विद्यालयात नोकरीला होते.

अपघातानंतर घटनास्थळी तोबा गर्दी जमा झाली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळाला भेट देत पाहणी केली. गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

कसा झाला अपघात?

रामेश्वर कदम आणि गंगाधर राऊळ हे मानवतच्या शकुंतला विद्यालयात नोकरीला होते. ते नेहमीप्रमाणे सकाळी दुकाचीवरून (एम. एच. २२ ए.एच. ७०३१०) शाळेकडे निघाले. मात्र, कल्याण ते निर्मल राष्ट्रीय महामार्गावरून पाथरीवरून परभणीला जाणाऱ्या ट्रकने (एम. एच. १३ आर. ३६८४) त्यांच्या दुचाकीला चिरडले. या अपघातात दोन्ही शिक्षकांचा घटनास्थळी मृत्यू झाला. तर चालकाने वाहन सोडून पळ काढला.

घटनास्थळी मोठी गर्दी

गुरुजींच्या गाडीला अपघात झाल्याची बातमी पंचक्रोशीत वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे परिसरातल्या आणि गावातल्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थीही जमले. दोन्ही शिक्षकांचे मृतदेह मानवतच्या रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेत. मात्र, या भीषण अपघाताने हळहळ व्यक्त केली जात आहे.

महिन्यात दुसरी घटना

परभणी जिल्ह्यात गेल्या महिन्यात झालेला हा दुसरा अपघात आहे. यापूर्वी लोहा ते गंगाखेड मार्गावर मालेवाडी पाटीजवळ दुचाकी आणि बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात आजोबा आणि नातु दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. श्रीनिवास शिंदे आणि शिवाजी शिंदे अशी मृतांची नावे होती. पालम तालुक्यातील रावराजूर येथील श्रीनिवास शिंदे (22) हा आपले आजोबा शिवाजी शिंदे (70) यांना घेऊन दवाखान्यात चालला होता. यावेळी झालेल्या अपघातात दोघांना आपले प्राण गमवावे लागले होते.

बातम्या आणखी आहेत...