आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिस्तभंगाची‎ कारवाई:परभणीचे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी निलंबित‎

परभणी6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील परिवहन‎ कार्यालयात कार्यरत सहायक‎ ‎ प्रादेशिक परिवहन‎ ‎ अधिकारी‎ ‎ श्रीकृष्ण नकाते‎ ‎ यांना सेवेतून‎ ‎ निलंबित करण्यात‎ ‎ आले आहे.‎ यासंदर्भातील आदेश शुक्रवारी‎ निर्गमित करण्यात आला आहे.‎ श्रीकृष्ण नकाते हे बीड येथे‎ कार्यरत असताना नियमबाह्य‎ पद्धतीने बोगस जड मालवाहू‎ वाहनांची नवीन नोंदणी केली होती.‎ महाराष्ट्र नागरी सेवा नियमाचा भंग‎ केल्याने त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची‎ कारवाई प्रस्तावित केली होती.‎

त्यानुसार नकाते यांना महाराष्ट्र‎ नागरी सेवा नियमान्वये सेवेतून‎ निलंबित करण्यात आल्याचे‎ निलंबन आदेशात म्हटले आहे. हा‎ आदेश अमलात असेपर्यंतच्या‎ कालावधीत श्रीकृष्ण नकाते यांचे‎ मुख्यालय धुळे येथील प्रादेशिक‎ कार्यालय राहील व प्रादेशिक‎ अधिकारी यांच्या‎ पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालय‎ सोडता येणार नसल्याचेही या‎ आदेशात नमूद केले आहे. परभणी‎ येथील प्रादेशिक परिवहन‎ कार्यालयातील सहायक प्रादेशिक‎ परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते‎ हे परभणी येथे कार्यरत असताना‎ त्यांच्या कामकाजाबद्दल अनेक‎ तक्रारी यापूर्वीच करण्यात आलेल्या‎ आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...