आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हत्या:बहिणीची छेड काढणाऱ्या 40 वर्षीय व्यक्तीची तिघांकडून निर्घृण हत्या; परभणीच्या वनवाडीमधील घटना

परभणी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणीत तिघांनी मिळून एकरा चाळीस वर्षीय व्यक्तीचा खून केला आहे. बहिणीची छेड काढल्याच्या रागातून ही निर्घृण हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मृत व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टवर देखील धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकी घटना काय?

परभणीच्या पालम तालुक्यातील वनवाडीमध्ये राजेभाऊ शिवाजी वाडीकर याने सोमनाथ राजेभाऊ वाडीकर, रामेश्वर उर्फ बबलू राजेभाऊ वाडीकर, नागेश संजय वाडीकर यांच्या बहिणीची छेड काढली होती. याचा राग मनात ठेवत तिच्या तिन्ही भावांनी राजेभाऊ वाडीकर यांच्यावर सोमवारी रात्री हल्ला चढवला. यात त्यांच्या डोक्याला आणि प्रायव्हेट पार्टला गंभीर इजा झाली होती. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मयताच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पालम पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळतात पालम पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप काकडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेश सूर्यवंशी, पोलिस उपनिरीक्षक संदीप भोसले, पोलिस उपनिरीक्षक एस एस केंद्रे, एस पी कोलमवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी मंगळवारी पहाटे तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस पथक रवाना झाले. या पथकाने एका आरोपीला वानवडीच्या शिवारातून अटक केली. तर इतर दोन आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेश सूर्यवंशी हे करत आहेत.