आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणी:परभणीत पेट्रोल 121.83 पैसे; देशात सर्वाधिक दर, आंध्रात सर्वात कमी 87.24 पैसे

परभणी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणीत सोमवारी पेट्रोल-डिझेलचे दर देशात सर्वाधिक नोंदवले गेले. पेट्रोल लिटरमागे १२१.८३ रुपये तर पॉवर पेट्रोल प्रतिलिटरमागे १२८.०६ रुपये असे दर होते. डिझेलचा प्रतिलिटर दर १०४. ४३ रुपये होता. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत परभणीत अधिक दराने इंधन खरेदी करावे लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

परभणी जिल्ह्यात मनमाड भागातून इंधनाचा पुरवठा होत असतो. दरम्यान, देशात पेट्रोलचे सर्वात कमी दर आंध्र प्रदेशात असून सोमवारी आंध्रात पेट्रोल प्रतिलिटर ८७ रुपये २४ पैसे दर होता.

बातम्या आणखी आहेत...