आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेची ट्रिप निघाली अन् मोठा अनर्थ टळला!:मृत्यूच्या दाढेतून बचावले; 20 जण जखमी, काहींची प्रकृती गंभीर

परभणी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणीच्या गंगाखेड शहरातील संत जनाबाई विद्यालयाच्या स्कूल बसचा आणि एसटी बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 20 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. तर 4 जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना परभणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. तर इतरांना गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शहरातील संत जनाबाई विद्यालयाच्या स्कूलबसचा आणि एसटीचा समोरासमोर अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 20 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. चार जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी परभणी येथे हलवण्यात आले आहे. सदरील अपघात गंगाखेड सावरगाव रोडवरील खंडाळी गावाजवळ झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पिंपळदरी पोलिसांनी घटनास्थळी घेतली आहे.

गंगाखेड शहरातील संत जनाबाई विद्यालयाची स्कूल बस विद्यार्थ्यांना घेऊन चाकूर कडे जात असताना गाडी गंगाखेड तालुक्यातील खंडाळी गावाजवळ आली असता अहमदपूर वरून बुलढाण्याला जाणाऱ्या बस सोबत स्कूल बसचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातामध्ये स्कूल बसमधील विद्यार्थी आणि एसटी मधील 20 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाली आहेत. घटनेची माहिती मिळतात पिंपळदरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये हलविण्यात आले आहे.

या ठिकाणी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर हेमंत मुंडे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वाती मुंडे, डॉक्टर केशव मुंडे, डॉक्टर योगेश मल्लुरवार आणि रुग्णालयाच्या परिचारिकांनी अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींवर उपचार केला आहे. अपघातात जखमी झालेल्या चार जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी परभणी येथे हलवण्यात आले आहे. अशी माहिती गंगाखेड उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...