आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खळबळजनक:वाळू माफियांना रंगेहाथ पकडण्यासाठी तलाठी उतरले नदीत; पोहताना दम लागला, तलाठी बुडाले

परभणी3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील मौजे डिग्री‎ नदीपात्रात वाळूमाफियांना‎ पकडण्यासाठी गेलेले डिग्रस‎ सज्जाचे तलाठी सुभाष गणपतराव‎ ‎होळ हे नदीपात्रात‎ ‎ पाण्यात उतरले व‎ ‎ बेपत्ता झाले.‎ ‎रात्री उशिरापर्यंत त्यांचा‎ ‎शाेध लागला‎ नव्हता.‎

नदीच्या समोरील दुसऱ्या‎ काठावरून ट्रॅक्टरमध्ये वाळूमाफिया‎ वाळू भरत असल्याचे हाेळ यांना‎ दिसून आले. त्यांना पकडण्यासाठी‎ पाण्यात पोहून होळ दुसऱ्या काठावर‎ जात होते. पाणी जास्त असल्याचा‎ अंदाज त्यांना आला नाही. मध्यभागी‎ गेल्यावर ते अचानक पाण्यात बुडून‎ बेपत्ता झाले.

याबाबत माहिती‎ मिळाल्यावर उपजिल्हाधिकारी‎ अरुणा संगेवार, जिंतूर तहसीलदार‎ परेश चौधरी घटनास्थळी पोहोचले.‎ सकाळी 11 वाजेपासून तलाठी होळ‎ यांचा शोध सुरू असून ‎रात्री उशिरापर्यंत ते सापडले नाहीत.‎

जिंतूर तालुक्याच्या हद्दीत वाळू उपसा बंद होता. मात्र, त्याच नदीच्या पलीकडे सेनगाव तालुक्याची हद्दीत वाळू धक्का चालू असल्याचे निदर्शनास आले. कॅनीच्या सहाय्याने वाळू उपसा सुरू असल्याचे दिसताच तलाठी सुभाष होळ ती दिशेने नदीतून पोहत निघाले. 70 टक्के अंतर पार केल्यानंतर अचानक तलाठी होळ पाण्यात बुडाले.

एनडीआरफची टीम बोलावली

तलाठी सुभाष होळ पाण्यात बुडाल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तर सुभाष होळ यांचा शोध घेण्यात आला मात्र ते काही सापडले नाहीत. त्यामुळे शेवटी परभणी येथून एनडीआरएफचे पथक बोलावण्यात आले. मात्र रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता. तर घटनास्थळी महसूल उपविभागीय अधिकारी आरुणा संगेवार, प्रभारी तहसीलदार परेश चौधरी, सेलू तहसीलदार दिनेश झांपले यांच्यासह स्थानिक पोलिस घटनास्थळी तळ ठोकून आहेत.