आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामानवत तालुक्यातल्या रामेटाकळी शिवारात बस आणि ट्रकची टक्कर होऊन भीषण अपघात झाला. यात बसमधले दहा प्रवासी गंभीर जखमी झालेत. पाथरी-पोखरणी रस्त्यावर सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. यात ट्रक चालकही गंभीर जखमी झाल्याचे समजते.
पुण्याहून येणारी एक खासगी बस (एम. एच. 19 वाय 3232) ही परभणीकडे जात होती. या बसची पाथरी-पोखरणी रस्त्यावर ट्रकशी टक्कर झाली. अपघात इतका भयंकर होता की, खासगी बसचा समोरच्याचा भागाचा चुराडा झाला. ट्रकची अवस्थाही पाहण्यासारखी झाली. त्यात ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला.
अपघातामधील जखमींवर सध्या परभणीमध्ये उपचार सुरू असल्याचे समजते. मात्र, या जखमींची नावे अजून कळाली नाहीत. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रमेश स्वामी, सहायक पोलिस निरीक्षक आनंद बनसोडे, प्रभाकर कापुरे, जमादार मधुकर चट्टे यांनी भेट दिली.
दुसरीकडे सांगली जिल्ह्यात जतमध्ये शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. विजापूर- गुहाघर मार्गावरील अमृतवाडी फाट्याजवळ हा अपघात झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या डंपरला कारने धडक दिल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये आजी, आजोबा, सून, नात असल्याची माहिती समोर येत आहे.
सांगलीतील जतमध्ये राहणारे कुटुंब गाणगापूर येथे दर्शन घेऊन येत होते. यावेळी जतपासून पाच किलोमिटरच्या अंतरावर असणाऱ्या अमृतवाडी फाट्यावर समोर येणाऱ्या ट्रकपासून वाचण्यासाठी कारचालकाने गाडी बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी रस्त्याच्या कडेला असलेल्या डंपरला जोरात धडक बसून कारमधील पाच जणांचा मृत्यू झाला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.