आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक:सेप्टीक टँकची सफाई करताना 5 कामगारांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांनी केली मृतांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाखांची मदत

परभणी23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेप्टीक टँकची सफाई करण्यासाठी उतरलेल्या पाच कामगारांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. यात एक जण गंभीर असून गुरूवारी रात्री ही घटना घडली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या वारशांना प्रत्येकी 10 लाखांची मदत केली असून जखमींचा खर्च शासकीय खर्चातून करण्याचे निर्देष देण्यात आले आहेत.

परभणी जिल्ह्यात सोनपेठमधील भाऊचा तांडा शिवारात हा प्रकार घडला. तीन दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सेप्टीक टँकमध्ये उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला होता.

नक्की काय घडले?

परभणीत सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा या शिवारातील ही घटना घडली. एका शेतातील घराच्या सेफ्टीक टॅंक स्वच्छ करण्याचे कंत्राट परभणी आणि सोनपेठ मधील काही कामगारांनी घेतले होते. काल (11 मे) रात्री शेख सादेक, शेख जुनेद, शेख शाहरूख, शेख नवीद, शेख फेरोज, शेख साबेर हे सहा जण सेफ्टीक टॅंक स्वच्छ करत होते. दरम्यान, स्वच्छतेचे काम सुरु असताना कामगार गुरमरले की स्वच्छता करणाऱ्या मशीनचा त्यांना शॉक लागला हे कळू शकले नाही.

मात्र, या अपघातात शेख सादेक, शेख जुनेद,शेख शाहरूख,शेख नवीद, शेख फेरोज या पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर शेख साबेर हे अत्यवस्थ असल्याने त्यांना तात्काळ परळी येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. तर मृत पाचही जणांचे मृतदेह हे जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

सोनपेठमधील झालेल्या या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले असून मृतांच्या वारसांना राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या यासंदर्भातील योजनेतून प्रत्येकी १० लाख रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत. या दुर्घटनेतील जखमी झालेल्या कामगारावर आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपचार शासनाच्या खर्चातून करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मुख्यमंत्र्यांनी या घटनेची माहिती होताच त्वरित आवश्यक ती मदत देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.

संबंधित वृत्त

धक्कादायक:वॉचमनने पंधरा हजार देऊन चेंबरमध्ये उतरवले; गुदमरून 3 कामगारांचा मृत्यू

मनपाला कुठलीही माहिती न देता सलीम अली उद्यानात चेंबरमधील चोकअप काढण्यासाठी उतरवलेल्या तीन कामगारांचा सोमवारी सकाळी ११ वाजता विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू झाला. वाचा सविस्तर येथे