आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालयाच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था पुरवा:जिल्हा सत्र न्यायाधीशांचे परभणी अधीक्षकांना पत्र

परभणी5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घटस्फोटासाठी न्यायालय आवारात आलेल्या पती-पत्नीत तडजोड न झाल्याने पतीने न्यायालय परिसरातच पत्नीवर कटरने वार केले. यात पत्नी गंभीर जखमी झाली. या घटनेमुळे न्यायालय परिसरातील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. यासंदर्भात जिल्हा सत्र न्यायाधीशांनी पोलिस अधीक्षकांना पत्र पाठवून उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

पत्रात नमूद केले आहे की, राज्यातील न्यायालयीन इमारत व न्यायाधीशांचे निवासस्थान यांना २४ तास सशस्त्रधारी सुरक्षा व्यवस्था पुरवण्याबाबत राज्य शासनाचे आदेश आहेत. परंतु, जिल्ह्यातील अनेक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था पुरवलेली नाही. ७ नोव्हेंबर रोजी न्यायालय परिसरात पतीने पत्नीवर हत्याराने हल्ला करून गंभीर जखमी केले. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. न्यायालय परिसरात सुरक्षा वाढवून देण्यात यावी व इमारतीमध्ये येणाऱ्या प्रत्येकाची पोलिसामार्फत तपासणी करूनच प्रवेश देण्यात यावा, यासंदर्भात जिल्हा वकील संघाने मा.न्यायालयास अवगत केले आहे. त्यामुळे न्यायालय इमारत व न्यायाधीश यांचे निवासस्थान यांना २४ तास शस्त्रधारी पोलिस संरक्षण द्यावे.

बातम्या आणखी आहेत...