आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Parbhani
  • Ramdas Athavale Statment Mahavikas Aghadi | Marathi News | I Want Mahavikas Aghadi Government To Fall, But As Long As There Is Support Of Congress, The Government Will Not Fall Athavale

सरकार पडावे आठवलेंची इच्छा:महाविकास आघाडी सरकार पडावं ही माझी इच्छा, मात्र काँग्रेसचा जोपर्यंत पाठिंबा आहे तोपर्यंत सरकार पडणार नाही- आठवले

परभणी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाविकास आघाडी सरकार पडावे ही माझी इच्छा आहे. मात्र काँग्रेस जोपर्यंत पाठिंबा देत आहे तोपर्यंत तरी महाविकास आघाडी सरकार पडणार नाही, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले. ते आज परभरणीत पत्रकारांशी बोलत होते. केंद्रीय तपास यंत्रणा स्वायत्त आहेत, त्यामुळे त्या ज्या काही तपास करतात, त्या मुक्तपणे त्यामुळे केंद्रीय यंत्रणांवर आरोप करण्यात येत आहेत ते पूर्णपणे चुकीचे आहेत. उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार यांच्याशी आमचे चांगले संबंध आहेत. उद्योगधंद्यांमध्ये अनियमितता आढळल्यास, या कारवाया केल्या जातात. त्यामुळे त्या गोष्टी पाळल्यास तसे होणार नाही. असे म्हणत ईडी, सीबीआयकडून होत असलेल्या कारवायांवर, केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केंद्राची बाजू मांडली, ते परभणी दौऱ्यावर आले असता, पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना बोलले.

हे सरकार पडावे अशी माझी इच्छा

महाविकास आघाडी सरकारकडे बहुमत आहे. त्यामुळे हे सरकार पडावे अशी माझी आहे. मात्र, जोपर्यंत काँग्रेस बाहेर पडत नाही, किंवा शिवसेना आमच्या सोबत येत नाही, राष्ट्रवादी आमच्यासोबत येत नाही. तोपर्यंत काही महाविकास आघाडी सरकार पडणार नाही, असे म्हणत महाविकास आघाडीतील घटक पक्ष्यांना आपल्या सोबत येण्याचे छुपे निमंत्रनचं आठवले यांनी दिले आहे.

भाजप शिवसेना युती व्हावी

पुढे बोलताना आठवले यांनी शिवसेना आणि भाजप युतीवरल भाष्य केले. ते म्हणाले की, शिवसेना आणि भाजप एकत्र यावे यासाठी मी प्रयत्नशील होतो, आणि भविष्याच्या दृष्टीने दोन्ही पक्षांनी एकत्र यावे. यासाठी प्रयत्न करेल. शिवसेनेच्या अनेक नेत्यांसोबत माझ्या दिल्लीमध्ये भेटीगाठी होतात. त्यामुळे हे दोन्ही पक्ष एकत्र यावी यासाठी मी प्रयत्न करेल. असा म्हणत भविष्यात शिवसेना-भाजप यांच्या एकत्रिकरण्यासाठी आपली भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे, रामदास आठवले यांनी सूचित केले आहे. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देताना आठवलेंनी चक्क तिळगुळ घ्या अशा शुभेच्छा दिल्या. नंतर सारवासारव करत त्यांनी तीळगूळला आणखीन वेळ आहे म्हणत गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.

बातम्या आणखी आहेत...