आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाऊचा तांडा येथे सेप्टिक टँक स्वच्छ करताना त्यात अडकून ५ कामगारांचा गुदमरून मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी अाहे. ही घटना गुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. सफाईदरम्यान एक जण टँकमध्ये पडला. त्याला वाचवताना इतर चौघांचाही जीव गेला. ४ हजार रुपयांत त्यांनी हे काम घेतले होते. पोलिसांनी जेसीबी मागवून टँकवरील स्लॅब फोडत कामगारांना बाहेर काढले. परंतु, तोपर्यंत सर्वांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपये देण्याचे निर्देश दिले. शेख शाहरुख, नाविद शेख, सादिक शेख, जुनेद शेख असे मृत कामगाराचे नावे आहेत.
सर्व मृत एकमेकांचे नातेवाईक
सादिक शेख हे सोनपेठ नगर परिषदेत कामगार तर त्यांचा मुलगा शेख शाहरुख हा नगर परिषदेतच कंत्राटी तत्त्वावर कार्यरत होता. शेख जुनेद हा शेख सादिक यांचा जावई हाेता. शेख नवीद हा सख्खा भाऊ तर शेख फिराेज हा चुलत भाऊ हाेता.
मराठवाड्यातील दुसरी घटना
८ मे राेजी छत्रपती संभाजीनगरात सलीम अली उद्यानात चेंबरमधील चोकअप काढण्यासाठी उतरवलेल्या तीन कामगारांचा विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू झाला हाेता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.