आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवासी बचावले:60 प्रवाशांना घेऊन जाणारी बस पुलाला धडकली, परभणी-गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात

परभणी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी जिल्ह्यात आज (गुरुवार) बस अनियंत्रित होऊन अपघात घडलाय. 60 प्रवासी असणारी बस पुलाच्या कठड्याला धडकली. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसून सर्व प्रवासी सुखरूप आहेत.

कसा घडला अपघात?

समोरून येणाऱ्या ट्रकने हूल दिल्याने बसचालकाचे नियंत्रण सूटले व बस पुलाच्या कठड्याला धडकली. यामुळे बसमध्ये एकच गोंधळ उडाला. परभणी-गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावरून धारासूर मार्गे ही बस कोल्हापूरला जात होती. धारासूर पाटीजवळ हा अपघात घडला.

जीवित हानी टळली

बस पुलावर लटकलेल्या अवस्थेत असताना प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. या अपघातात जीवित हानी झाली नसली तरी काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. परभणी गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावरून गुरुवारी कोल्हापूरला ही बस जात होती. धारासूर पाटीजवळ येताच समोरून येणाऱ्या आयशर ट्रकने हूल दिली. त्यामुळे अपघात घडला.