आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:लाडनांद्रा येथे पोलिसांवर दगडफेक; तीन जखमी, पोलिसांनी आठ ग्रामस्थांना घेतले ताब्यात

सेलू4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यात्रोत्सवात जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिस यात्रेत घुसून कारवाई करीत होते. दरम्यान, याचप्रसंगी पोलिसांवर दगडफेक झाल्याने पीआयसह तीन पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची घटना सेलू तालुक्यातील लाडनांद्रा येथे रविवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. दरम्यान, पोलिसांनी या घटनेसंदर्भात आतापर्यंत आठ जणांना ताब्यात घेतले आहे.

सेलू तालुक्यातील लाडनांद्रा हे गाव पाथरी पोलिस ठाण्याअंतर्गत आहे. नेहमीप्रमाणे लाडनांद्रा येथे जागृत देवस्थान भैरवनाथ यांची यात्रा भरली होती. या यात्रेत जुगार चालविणाऱ्यांनी आपली दुकाने थाटली होती. या जुगारचालकांवर कारवाई करण्यासाठी प्रभारी पोलिस निरीक्षक वसंत चव्हाण पथकासह त्या ठिकाणी गेले. यात्रेत सुरू असलेल्या जुगारचालकांना पोलिसांकडून मारहाण करण्यात आली. यात्रेत अचानकपणे घडलेल्या या प्रकारामुळे आणि रात्रीची वेळ असल्याने एकच खळबळ उडाली. जमावाने देखील अगोदर मातीची ढेकळे आणि नंतर दगडफेक केली. यात प्रभारी पोलिस निरीक्षक वसंत चव्हाण यांचा हात फ्रॅक्चर झाला. तर पोलिस नाईक सुरेश वाघ यांच्या डोक्यात दगड लागल्याने जखमी झाले. सहायक पोलिस उपनिरीक्षक जाफर यांना देखील कानाखाली मार लागल्याने ते जखमी झाले. इतर कर्मचाऱ्यांना मातीचे ढेकळे जमावाने फेकून मारल्याने ते किरकोळ जखमी झाले आहेत. हा प्रकार घडल्याने एकच गोंधळ उडाला. याप्रसंगी काही ग्रामस्थ पोलिसांच्या मदतीला धावून गेले. पोलिस कर्मचारी यांना भैरवनाथ मंदिरात ठेवण्यात आले. सेलू, पाथरी आणि परभणीहून पोलिस बल मागविण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...