आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:फुलकळस येथील शेतकऱ्याची आत्महत्या

परभणी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथून जवळच असलेल्या फुलकळस (ता. पूर्णा) येथील रहिवासी गणेश विश्वनाथ घोडेकर (६५) यांनी माखणी शिवारातील त्यांच्या शेतामध्ये बुधवारी लिंबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. गणेश घोडेकर हे काही दिवसांपासून शेतीसाठी घेतलेल्या बँकेच्या कर्जामुळे चिंतेत होते. ताडकळस पोलिस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. घटनेचा पुढील तपास ताडकळस पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विजय रामोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ गणेश लोंढे व रामकिसन काळे हे करत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...