आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणी:मनसेचे शहरप्रमुख सचिन पाटील यांच्या खुनातील आरोपीस केली अटक

परभणी20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहरप्रमुख सचिन पाटील यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विजय जाधव यास सोमवारी (१२ सप्टेंबर) सेलू येथून अटक करण्यात आली. पत्ते खेळत असताना झालेल्या वादातून मनसे शहरप्रमुख सचिन पाटील व विजय जाधव यांच्यात वाद झाला होता. वाद वाढल्याने प्रकरण मारहाणीपर्यंत गेले व अखेरीस आरोपी विजय जाधवने सचिन पाटील यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. यात अति रक्तस्राव झाल्याने सचिन पाटील यांचा मृत्यू झाला. यानंतर आरोपी विजय जाधव हा फरार होता. सेलू येथून आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...