आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाईसाठी गेले होते:वाळूमाफियांना पकडण्यास‎ गेलेले तलाठी बुडाले‎

जिंतूर3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिंतूर तालुक्यातील मौजे डिग्री‎ नदीपात्रात वाळूमाफियांना‎ पकडण्यासाठी गेलेले डिग्रस‎ सज्जाचे तलाठी सुभाष गणपतराव‎ ‎ होळ हे नदीपात्रात‎ ‎ पाण्यात उतरले व‎ ‎ बेपत्ता झाले.‎ ‎ सायंकाळी ६‎ ‎ वाजेपर्यंत त्यांचा‎ ‎ शाेध लागला‎ नव्हत

नदीच्या समोरील दुसऱ्या‎ काठावरून ट्रॅक्टरमध्ये वाळूमाफिया‎ वाळू भरत असल्याचे हाेळ यांना‎ दिसून आले. त्यांना पकडण्यासाठी‎ पाण्यात पोहून होळ दुसऱ्या काठावर‎ जात होते. पाणी जास्त असल्याचा‎ अंदाज त्यांना आला नाही. मध्यभागी‎ गेल्यावर ते अचानक पाण्यात बुडून‎ बेपत्ता झाले. याबाबत माहिती‎ मिळाल्यावर उपजिल्हाधिकारी‎ अरुणा संगेवार, जिंतूर तहसीलदार‎ परेश चौधरी घटनास्थळी पोहोचले.‎ सकाळी ११ वाजेपासून तलाठी होळ‎ यांचा शोध सुरू असून सायंकाळी ६‎ वाजेपर्यंत ते सापडले नाहीत.‎