आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:भाजप प्रदेशाध्यक्षांना काळे झेंडे दाखवत अडवला ताफा ; आंबेडकरी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन सोडले

परभणी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे परभणी जिल्हा दौऱ्यावर असताना आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवून ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. बावनकुळे यांचा ताफा दुपारी १२ वाजेच्या सुमारास वसमत रस्त्यावरील वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याजवळ आला असताना आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केला. यावेळी बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांनी आंदोलकांना ताब्यात घेत व नंतर सोडून दिले.

यावेळी बावकुळे यांनी परभणीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी आ. मेघनाताई बोर्डीकर, भाजयुमो प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर व जिल्ह्यातील नेते उपस्थित होते. या वेळी महाविकास आघाडी सरकारच्या धोरणावर त्यांनी टीका केली. ते म्हणाले की, अडीच वर्षांच्या काळात केंद्र शासनाच्या योजनांच्या पाठपुरावा करू नये, असा प्रशासनाला अलिखित आदेश होता.

‘त्या’ बैठकीला उद्धव ठाकरे यांनी न येणे अत्यंत दुर्दैवी बाब जी-२० परिषदेचे अध्यक्षपद भारताला मिळणे ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. त्यामुळे संपूर्ण जगाला देशाची उज्ज्वल परंपरा, संस्कृती व ताकद कळणार आहे. राज्यात जी-२० परिषदेचे १४ ते १५ ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला केवळ राजकीय द्वेषापोटी उद्धव ठाकरे उपस्थित राहिले नाहीत. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे, असे मत बावनकुळे यांनी व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...