आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारवा स्वच्छ करण्याची मोहीम:परभणीतील वालूरची चकाचक झालेली बारव दीपोत्सवाने उजळली

परभणीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वालूरची चकाचक झालेली बारव दीपोत्सवाने उजळली आहे. बारव संवर्धन समितीच्या सदस्यांनी जिल्ह्यातील विविध बारवा स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली आहे. दहा दिवसांच्या अविरत मेहनतीनंतर १५० गावकरी आणि तरुणांनी वालूरची बारव स्वच्छ केली. अष्टकोन हे बारवेचे वैशिष्ट्य आहेत. सर्व बाजूंनी आत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. सोमवारी रात्री या बारवेमध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला. डोळ्याचे पारणे फेडणारा हा दीपोत्सव होता. मानवतमध्ये गेल्या ३३ दिवसांपासून बारवेमधील गाळ काढून ती वापरण्यायोग्य करण्यात येत आहे. बारव संवर्धन समितीचे मल्हारीकांत देशमुख यांनी सांगितले की, स्वच्छता व गाळ काढल्यानंतर या बारवेला पाणी लागले आहे. पाण्याचे पूजन केले. गावकरी आता ते पाणी वापरू शकतात. या वेळी सेलूचे तहसीलादारही उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...